पैठण, (प्रतिनिधी) : स्वतः च्या गावात सोसायटीमध्ये निवडून येण्याची कुवत नसलेल्या कडून शिवसेना शिंदे गटा कडून नगरपरिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचा सर्वे करण्यात येत आहे. हे कुवत नसलेले पुढारी आपल्या मर्जी प्रमाणे निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून विरोधी पक्षाच्या उमेदवारांचा चांगला अहवाल आमदार विलास भुमरे यांच्या कडे देत आहेत.
यामुळे गेल्या नऊ वर्षापासून पक्षाचे एक निष्ठेने काम करणाऱ्या शिवसैनिकात संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच निष्ठावंत शिवसेनेचे इच्छुक कार्यकर्ते यांना डावण्यासाठी युतीचा फार्स करून काही लोकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर युती करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तर
मागील वेळी दुसऱ्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्यांना ऐनवेळी पक्षात आलेल्या पक्षात प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी दिली जात आहे.
इतकेच नव्हे तर काहींनी शिवसेनेत प्रवेश न करता त्यांना उमेदवारी दिली जात असल्याने कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. वास्तविक पाहता ही निवडणूक कार्यकर्त्यांची असते पाच वर्ष हे कार्यकर्ते एक निष्ठेने पक्षाचे काम करतात जेणेकरून आपल्याला भविष्यात उमेदवारी मिळेल हा हेतू असतो त्यामुळे स्थानिक पातळीवर कोणत्याही पक्षाबरोबर युती न करता कार्यकर्त्यांना उमेदवारी देणे आवश्यक असते असे न करता निष्ठावंत शिवसैनिकांना उमेदवारी पासून डावळण्यासाठी चुकीच्या पद्धतीने युती केली जात आहे.














